२५ जुलै घटना
-
२००७: प्रतिभा पाटील — यांची भारताच्या १४व्य राष्ट्रपती म्हणून निवड, तसेच त्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा आहेत.
-
१९९७: के. आर. नारायणन — यांची भारताचे १०वे राष्ट्रपती म्हणून निवड.
-
१९९४: — इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त.
-
१९९२: ऑलिम्पिक — बार्सिलोना, स्पेन येथे २५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
-
१९८४: स्वेतलाना साव्हित्स्काया — या अंतराळात चालणाऱ्या (Space Walk) पहिल्या महिला अंतराळवीर बनल्या.
-
१९७८: लुईस जॉन ब्राऊन — जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
-
१९७३: मार्स ५ स्पेस प्रोब — सोव्हिएत संघाने लाँच केले.
-
१९७३: मार्स — हे सोव्हिएत संघाचे अंतराळयान प्रक्षेपित.
-
१९६५: बॉब डायलन — यांनी पहिल्यांदा इलेक्ट्रिक गिटार चा वापर केला. रॉक संगीताची सुरवात येथून झाली असे मानले जाते.
-
१९४६: क्रॉसरोड्स बेकर डिव्हाइस — ही पहिली पाण्याखाली आण्विक शस्त्र चाचणी आहे.
-
१९४४: दुसरे महायुद्ध — ऑपरेशन स्प्रिंग: युद्धादरम्यानच्या पहिल्या कॅनेडियन सैन्यासाठी सर्वात रक्तरंजित दिवसांपैकी एक आहे.
-
१९४३: दुसरे महायुद्ध — इटलीत बेनिटो मुसोलिनी यांची हकालपट्टी झाली.
-
१९१७: कॅनडा — देशात तात्पुरती आयकर प्रस्ताव सर रॉबर्ट बॉर्डन यांनी सादर केला.
-
१९१७: कॅनडा — देशात आयकर लागू झाला.
-
१९०९: लुई ब्लेरियो — यांनी पहिल्यांदाच विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
-
१९०८: किकूने इकेदा — यांनी मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला.
-
१८९४: — पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
-
१८३७: इलेक्ट्रिकल टेलिग्राफ — विल्यम कुक आणि चार्ल्स व्हीटस्टोन यांनी पहिल्या व्यावसायिक इलेक्ट्रिक टेलिग्राफचे यशस्वी प्रक्षेपण केले.
-
१८१४: १८१२ चे युद्ध — कॅनडा देशाने अमेरिकन हल्ला परतवून लावला.
-
१६६८: चीन — देशामध्ये झालेल्या ८,५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात किमान ४२ हजार लोकांचे निधन.
-
१६४८: मराठा साम्राज्य — आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले.
-
०३०६: — कॉन्स्टॅटाइन पहिला रोमन सम्राट बनले.