२६ मे घटना
घटना
- १८९६: निकोलस (दुसरा) – रशियाचा झार बनला.
- १९७१: बांगलादेश मुक्तिसंग्राम – बांगलादेशातील सिल्हेटमधील बुरुंगा येथे पाकिस्तानी लष्कराने किमान ७१ हिंदूंची कत्तल केली.
- १९८९: – मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उदघाटन झाले.
- १९९९: – श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. - सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. - टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
- २०१४: – नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
- २०२२: गीतांजली श्री – लिखित रेत समाधी या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरीत टॉम्ब ऑफ सेंड (Tomb of Sand) पुस्तकासाठी २०२२ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला.