२८ जून घटना - दिनविशेष


१९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
१९९७: मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेते घोषित करण्यात आले.
१९९४: विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.
१९८७: लष्करी इतिहासात प्रथमच, इराकी युद्ध विमानांनी इराणच्या सरदश्त शहरावर बॉम्बफेक करून रासायनिक हल्ल्यासाठी नागरी लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले.
१९७८: अमेरिका - सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
१९७२: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.
१९५०: कोरियन युद्ध - बोडो लीग हत्याकांड: ६० हजार ते २ लाख संशयित कम्युनिस्ट सहानुभूतीधारकांना फाशी देण्यात आली.
१९४८: डिक टर्पिन - यांनी विन्स हॉकिन्स यांचा पराभव करून पहिले कृष्णवर्णीय ब्रिटिश बॉक्सिंग चॅम्पियन बनले.
१९४२: दुसरे महायुद्ध - ऑपशन केस ब्लू: नाझी जर्मनीने सोव्हिएत युनियन विरुद्ध आक्रमण सुरू केले.
१९२६: मर्सिडीज-बेंझ - गॉटलीब डेमलर आणि कार्ल बेंझ यांच्या दोन कंपन्यांचे विलीनीकरण करून या कपंनीची सुरवात केली.
१९१९: व्हर्सायचा तह - जर्मनी आणि मित्र राष्ट्रांमधील या तहामुळे पहिले महायुद्ध संपले.
१९१७: पहिले महायुद्ध - ग्रीस देश मित्र राष्ट्रांमध्ये सामील झाला.
१९१४: पहिले महायुद्ध - ऑस्ट्रियाचा आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग यांची हत्या. पहिल्या महायुद्धाची सुरवात होण्यासाठी ही घटना कारणीभूत आहे.
१९११: नखला उल्कापात - पृथ्वीवर इजिप्त देशामध्ये पडली.
१९०४: एसएस नॉर्गे जहाज - उत्तर अटलांटिक महासागरात हे जहाज बुडाले, यात किमान ६३५ लोकांचे निधन.
१८४६: ऍडॉल्फ सॅक्स - यांनी सॅक्सोफोन वाद्याचे पेटंट घेतले.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024