२०१५:कोपा अमेरिका कप— चिली देशाने २०१५ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील पहिले विजेतेपद पटकावले.
२००९:स्टॅच्यू ऑफ लिबर्टी— ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आठ वर्षांच्या बंदनंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लोकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले.
२००६:स्पेस शटल प्रोग्राम— डिस्कव्हरीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर STS-121 प्रक्षेपित केले.
२००५:डीप इम्पॅक्ट कोलायडर— हा धूमकेतू टेम्पेल १ ला धडकला.
२००४:फ्रीडम टॉवर, न्यूयॉर्क— वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जागेवर या इमारतीची कोनशिला घातली गेली.
२००४:UEFA युरो कप— ग्रीस देशाने २००४ च्या अंतिम सामन्यात पोर्तुगालचा पराभव करून इतिहासात प्रथमच युरोपियन चॅम्पियन बनला.
१९९८:नोझोमी प्रोब— जपानने मंगळावर प्रक्षेपित केले.
१९९७:पाथफाइंडर— नासाचे मानवविरहित यान मंगळावर उतरले.
१९९५:गोविंद स्वरूप— यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान केला.
१९५०:शीतयुद्ध— रेडिओ फ्री युरोपने प्रथम प्रसारण केले.
१९४७:इंडियन इंडिपेडन्स बिल— भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.
१९४६:फिलीपिन्स— देशाला जवळपास ३८१ वर्षांच्या अमेरिकन वसाहतवादी शासनानंतर पूर्ण स्वातंत्र्य मिळाले.
१९४३:दुसरे महायुद्ध— कुर्स्कची लढाई: इतिहासातील सर्वात मोठी पूर्ण-स्तरीय लढाई आणि जगातील सर्वात मोठीरणगाड्यांची लढाई सुरू झाली.
१९४२:दुसरे महायुद्ध— सेवास्तोपोल शहराचा वेढा: २५० दिवसांनी वेढा संपला.
१९४१:— नाझी सैन्याने पोलिश शास्त्रज्ञ आणि लेखकांची हत्या केली.
१९४१:दुसरे महायुद्ध— रीगा सिनेगॉग्ज हत्याकांड: जर्मन सैन्याने ग्रेट कोरल सिनेगॉग तळघरात ३०० ज्यूं लोकांना बंद करून जाळले गेले.
१९३६:अमरज्योती— चित्रपट प्रदर्शित झाला.
१९१८:पहिले महायुद्ध— हॅमेलची लढाई: ऑस्ट्रेलियन सैन्याने ले हॅमेल शहराजवळ असणाऱ्या जर्मन स्थानांवर यशस्वी हल्ला केला.
१९११:स्वातंत्र्यवीर सावरकर— यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला.
१९०३:डॉरोथी लेव्हिट— मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.
१९०३:फिलीपीन-अमेरिकन युद्ध— अधिकृतपणे संपले.
१८८६:स्टॅच्यू ऑफ लिबर्टी— फ्रांसने अमेरिकेला ही मूर्ती भेट दिली.
१७७६:अमेरिका— देशाने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले.
१०५४:— वृषभ राशीत क्रॅब नेब्यूला दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. १७३१ मधे त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.