२००७:२००८ आर्थिक मंदी— डाऊ जोन्स औद्योगिक सरासरीने १४,१६४पॉइंट्सच्या सर्वकालीन उच्चांक गाठला, त्यानंतर लावकरच २००८ ची आर्थिक मंदी येणार होती.
२००६:उत्तर कोरिया— देशाने पहिली आण्विक चाचणी घेतली.
१९८६:द फॅंटम ऑफ द ऑपेरा— लंडनमधील दुसरे सर्वात जास्त काळ चालणारे संगीत, सुरु झाले.
१९७०:भारतीय वायू सेना— भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द.
१९६७:अर्नेस्टो 'चे' गुएवारा— पकडल्याच्या एका दिवसानंतर, बोलिव्हियामध्ये क्रांती भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फाशी देण्यात आली.
१९६३:इटली भूस्खलन दुर्घटना— मोठ्या भूस्खलनामुळे वाजोंट धरणाच्या वरून लाट आली आणि किमान २ हजार लोकांचे निधन.
१९६२:युगांडा— स्वतंत्र राष्ट्रकुल क्षेत्र बनले.
१९४६:भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Serives, IFS)— सुरवात.
१९३६:हूवर डॅम— मधून वीज निर्मिती करण्यास सुरवात.
१९१४:पहिले महायुद्ध— अँटवर्पचा वेढा संपला.
१८७४:युनिव्हर्सल पोस्टल युनियन— बर्नच्या कराराद्वारे तयार करण्यात आले.
१८७३:यू.एस. नेव्हल इन्स्टिट्यूट— स्थापना झाली.
१८४७:स्वीडिश वसाहतीत गुलामगिरी— संपुष्टात आली.
१८२०:ग्वायाकिल— देशाने स्पेनपासून स्वातंत्र्य घोषित केले.
१७९०:उत्तर अल्जेरिया भूकंप— या भूकंपामुळे भूमध्य समुद्रात निर्माण झालेल्या त्सुनामी मुले किमान तीन हजार लोकांचे निधन.
१७६०:सात वर्षांचे युद्ध— रशियन आणि ऑस्ट्रियन सैन्याने बर्लिनवर कब्जा केला.
१७४०:बटाव्हिया हत्याकांड— डच वसाहतवादी आणि जावानीज मूळ लोकांनी बटाव्हियामधील वांशिक चिनी नागरिकांची हत्या करण्यास सुरवात केली, त्यात किमान १० हज़ात लोकांची हत्या.
१७०१:येल युनिव्हर्सिटी, अमेरिका— सुरुवात.
१६०४:केपलरचा सुपरनोव्हा— हा आकाशगंगेमध्ये पाहण्यात आलेला सर्वात अलीकडील सुपरनोव्हा आहे.
१४४६:हंगुल वर्णमाला— कोरिया मध्ये प्रकाशित झाली.
१४१०:प्राग खगोलीय घड्याळ— प्रथम उल्लेख करण्यात आला.
जन्म
१९६८:अंबुमणी रामदोस— भारतीय राजकारणी, खासदार
१९६६:डेव्हिड कॅमरुन— इंग्लंडचे पंतप्रधान
१९६६:क्रिस्टोफर ओस्टलंड— स्वीडिश उद्योजक, प्लाझा मॅगझीनचे संस्थापक
१९४५:अमजद अली खान— भारतीय शास्त्रीय सरोद वादक — पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
१९२४:इमानुवेल देवेन्द्रर— भारतीय सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, नागरी हक्क कार्यकर्ते
१९०६:लेओपोल्ड सेडर सेघोर— सेनेगल देशाचे पहिले राष्ट्रपती
१८९७:एम. भक्तवत्सलम— भारतीय राजकारणी, मद्रास राज्यचे ४थे मुख्यमंत्री
१८७७:गोपबंधु दास— भारतीय समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी
१८७६:पंडित धर्मानंद कोसंबी— भारतीय बौद्ध धर्माचे अभ्यासक
१८५२:एमिल फिशर— जर्मन रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
१७५७:चार्ल्स (दहावा)— फ्रान्सचा राजा
१४४६:मिन्खाउंग II— अवाचे राजा
१२०१:रॉबर्ट डी सॉर्बन— फ्रेंच धर्मशास्त्रज्ञ आणि शिक्षक, सॉर्बोन कॉलेजचे संस्थापक
निधन
२०२२:टेमसुला एओ— भारतीय कवी आणि लेखक
२०२२:भंवरलाल शर्मा— भारतीय राजकारणी, राजस्थानचे आमदार
२०१५:रवींद्र जैन— भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक — पद्मश्री
२०१५:रिचर्ड एफ. हेक— अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
२०१३:श्रीहरी— भारतीय अभिनेते
२००६:कांशी राम— भारतीय वकील आणि राजकारणी
२०००:कर्नल पॅट्रिक अँथनी पोर्टिअस— भारतीय-स्कॉटिश सैनिक — व्हिक्टोरिया क्रॉस
१९९९:नूतन पेंढारकर— भारतीय रंगभूमी अभिनेते
१९९८:जयवंत पाठारे— भारतीय छायालेखक (Cinematographer)
१९८७:गुरू गोपीनाथ— भारतीय कथकली नर्तक
१९६७:चे गुएवारा— क्युबन क्रांतिकारी
१९५५:गोविंदराव टेंबे— भारतीय संगीतकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक
१९१४:विनायक कोंडदेव ओक— भारतीय बालवाङ्मयकार
१८९२:गोपाळ हरी देशमुख— भारतीय पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार