११ जून घटना - दिनविशेष


२००८: फर्मी गामा रे स्पेस टेलिस्कोप - प्रक्षेपित करण्यात आला.
२००४: कॅसिनी-हायगेन्स - अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.
२००२: अँटोनियो म्यूची - यांना टेलिफोनचे पहिले शोधकर्ता म्हणून युनायटेड स्टेट्स कॉंग्रेसने मान्यता दिली.
१९९८: कॉम्पॅक कॉम्पुटर - या कंपनीने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.
१९९७: भारतीय हवाई दल - सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने दाखल.
१९८७: बर्नी ग्रँट - ग्रेट ब्रिटन मधील पहिले कृष्णवर्णीय संसदेत निवडून आले.
१९८१: गोलबाफ भूकंप - इराणमधील झालेल्या ६.९ तीव्रतेच्या भूकंपात किमान २००० लोकांचे निधन.
१९८१: डायन ऍबॉट - ग्रेट ब्रिटन मधील पहिल्या कृष्णवर्णीय महिला संसदेत निवडून आल्या.
१९८१: पॉल बोटेंग - ग्रेट ब्रिटन मधील पहिले कृष्णवर्णीय कॅबिनेट मंत्री म्हणून निवडून आले.
१९७०: एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन - यांना अधिकृतपणे अमेरिकेतील यूएस आर्मी ब्रिगेडियर जनरल म्हणून मन मिळाला, हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्या.
१९७०: ऍना मे हेस - यांना अधिकृतपणे अमेरिकेतील यूएस आर्मी जनरल म्हणून मन मिळाला, हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्या.
१९६३: अमेरिकन नागरी हक्क चळवळ - नॅशनल गार्ड सैन्याच्या संरक्षणात विवियन मालोन आणि जेम्स हूड या दोन कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांनी अलाबामा विद्यापीठ नोंदणी केली.
१९६३: १९६४ चा नागरी हक्क कायदा, अमेरिका - प्रस्तावित केला गेला.
१९५५: २४ तास ऑफ ले मॅन्स - या रेस मध्ये झालेल्या अपघातात, ८३प्रेक्षकांचे निधन तर १००प्रेक्षक जखमी, मोटरस्पोर्ट्स रेस मध्ये झालेला हा सगळ्यात घातक आणि मोठा अपघात आहे.
१९४०: दुसरे महायुद्ध - इटालियन हवाई हल्ल्यांच्या मालिकेने माल्टाचा वेढा सुरू झाला.
१९३८: दुसरे चीन जपानी युद्ध - वुहानची लढाई सुरू झाली.
१९३७: जोसेफ स्टालिन - यांनी आपल्याच ८ लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केली.
१९३५: एडविन आर्मस्ट्राँग - यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
१९०१: न्यूझीलंड - देशानेने कूक बेटे बळकावली.
१८९५: पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस - ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.
१६६५: मराठा साम्राज्य - मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
१०६८: लॉयड जे. ओल्ड - यांनी पहिल्यांदा सेल पृष्ठभागावरील प्रतिजन ओळखले, जे वेगवेगळ्या पेशी प्रकारांमध्ये फरकओळखू शकतात.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024