१९७७:— रोहित्रावर वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.
१९५५:— २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.
१९२९:जतिंद्रनाथ दास— यांनी लाहोर तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचे निधन झाले.
१९०८:ऑलिम्पिक स्पर्धा— स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
१८३७:बकिंगहॅम पॅलेस, इंग्लंड— राणी व्हिक्टोरिया यांनी या पॅलेसमध्ये अधिकृतपणे राहण्यास सुरवात केली, तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजा-राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.
१६६०:मराठा साम्राज्य— पावनखिंडीतील लढाई.
जन्म
१९६४:उत्पल चॅटर्जी— भारतीय क्रिकेट खेळाडू
१९५३:लॅरी गोम्स— वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू
१९५०:जुरेलांग झेडकिया— मार्शल बेटांचे ५वे अध्यक्ष
१९४६:पांडुरंग राऊत— भारतीय राजकारणी, गोव्याचे आमदार
१९४४:एर्नो रुबिक— रुबिक क्यूबचे निर्माते
१९४२:हॅरिसन फोर्ड— अमेरिकन अभिनेते
१८९२:केसरबाई केरकर— भारतीय शास्त्रीय गायिका — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
१६०८:फर्डिनांड तिसरा— पवित्र रोमन सम्राट
निधन
२०१०:मनोहारी सिंग— प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक
२००९:निळू फुले— हिंदी मराठी चित्रपट अभिनेते
२०००:इंदिरा संत— कवयित्री व लेखिका — साहित्य अकादमी पुरस्कार
१९९४:पं. के. जी. गिंडे— धृपद गायक, संगीतकार शिक्षक
१९९०:बॉबी तल्यारखान— क्रीडा समीक्षक व समालोचक
१९८०:सेरेत्से खामा— बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
१९६९:धोंडीराज शास्त्री— स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक
१९२१:गॅब्रिएल लिप्पमन— लक्झेंबर्गर-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार