२ जून घटना - दिनविशेष


२०२२: तुर्की / तुर्किये - देशाने तुर्की हे नाव अधिकृतपणे बदलून तुर्किये असे ठेवले.
२०१४: तेलंगणा - भारताचे २९वे राज्य झाले.
२००३: मार्स एक्सप्रेस - युरोपियन स्पेस एजन्सीचे प्रोब प्रक्षेपित, युरोपने दुसऱ्या ग्रहावर, मंगळावर जाण्याचा पहिला प्रवास सुरू केला.
२०००: अमृता प्रीतम - यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर.
१९९९: भूतान - देशामध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.
१९७९: पोप जॉन पॉल (दुसरे) - यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
१९६६: सर्वेअर प्रोग्राम - सर्वेअर 1 चंद्रावर उतरले, दुसऱ्या जगावर सॉफ्ट-लँड करणारे पहिलेअमेरिकन स्पेसक्राफ्ट बनले.
१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) - स्थापना झाली.
१९५३: राणी एलिझाबेथ (दुसरी) - यांचा इंग्लंडमध्ये राज्याभिषेक.
१९४९: दक्षिण आफ्रिका - देशामध्ये उच्च्वर्णीय लोकांना सोडून इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
१९४६: इटली - देशाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
१९२४: भारतीय नागरिकत्व कायदा, अमेरिका - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी भारतीय नागरिकत्व कायद मंजूर केला आणि अमेरिकेच्या प्रादेशिक मर्यादेत जन्मलेल्या सर्व मूळ अमेरिकन लोकांना नागरिकत्व दिले.
१९१०: चार्ल्स रोल्स - विमानाने इंग्रजी चॅनेल न थांबता २ वेळा पार करणारे पहिले व्यक्ती आहेत.
१९०९: अल्फ्रेड डीकिन - तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान झाले.
१८९७: मार्क ट्वेन - स्वतःच्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेन म्हणाले, माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.
१८९६: गुग्लियेमो मार्कोनी - यांना रेडिओचे पेटंट मिळाले.
१८००: कॅनडा - देशात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024