२४ ऑगस्ट
-
७९: — इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट.
-
२००१: — सरोद वादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचातानसेन पुरस्कार जाहीर.
-
१९९८: — एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.
-
१९९७: — दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
-
१९९५: — मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
-
१९९१: — एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.
-
१९८०: — झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
-
१९६६: — रशियाचे लुना-११ हे मानव विरहित यान चांद्र मोहिमेवर निघाले.
-
१९६०: — इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
-
१९५०: — एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.
-
१९४४: — दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.
-
१९३६: — ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला.
-
१९१९: — जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.
-
१८९१: — थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
-
१८७५: — कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.
-
१८२५: — उरुग्वेे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.
-
१६९०: — कोलकाता शहराची स्थापना.
-
१६०९: — गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
-
१६०८: — ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत ला दाखल.
-
१९२९: यासर अराफत — पॅलेस्टाइनचे नेते — नोबेल पुरस्कार
-
२०१९: अरुण जेटली — भारतीय राजकीय नेते — पद्म विभूषण
-
२०१६: वॉल्टर स्केल — जर्मनी देशाचे ४थे अध्यक्ष, जर्मन राजकारणी
-
२०१२: दादुल्ला — पाकिस्तानी तालिबानचे नेते
-
२०१२: पाउली एलिफसेन — फारो बेटां देशाचे ६वे पंतप्रधान, राजकारणी
-
२००८: वै वै — चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार
-
२०००: कल्याणजी वीरजी शहा — ज्येष्ठ संगीतकार — पद्मश्री
-
१९९३: दि. ब. देवधर — क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू
-
१९६७: हेन्री जे. कैसर — कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियमचे संस्थापक
-
१९५४: गेटुलिओ वर्गास — ब्राझील देशाचे १४वे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी
-
१९४०: पॉल गॉटलीब निपको — पोलिश-जर्मन तंत्रज्ञ आणि शोधक, निपको डिस्क कंपनीचे संशोधक
-
१९२५: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर — प्राच्यविद्या संशोधक
-
१५०७: यॉर्क च्या Cecily — इंग्रजी राजकुमारी
-
१३१३: हेन्री सातवा — पवित्र रोमन सम्राट
-
११०३: मॅग्नस अनवाणी — नॉर्वेजियन राजा
-
०८९५ इ.स: गुथ्रेड — नॉर्थम्ब्रिया देशाचे राजा
-
०८४२: सागा — जपानी सम्राट