२५ ऑगस्ट
घटना
- २०१२: व्हॉयेजर १ — अंतराळयान आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली.
- १९९१: बेलारूस — देशाला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले.
- १९८९: व्हॉयेजर २ — अंतराळयान नेपच्यून ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले.
- १९८१: व्हॉयेजर २ — अंतराळयान शनी ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले.
- १९८०: झिम्बाब्वे — देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
- १९४५: दुसरे महायुद्ध — संपल्यानंतर दहा दिवसांनी जपानने शरणागतीची घोषणा केली.
- १९४४: दुसरे महायुद्ध — मित्र राष्ट्रांनी पॅरिस शहर मुक्त केले.
- १९४२: दुसरे महायुद्ध — पूर्व सोलोमनची लढाई: जपानी नौदल वाहतूक काफिला मित्र राष्ट्रांच्या हवाई हल्ल्याने मागे वळला.
- १९४०: दुसरे महायुद्ध — ब्रिटीश रॉयल एअर फोर्सने बर्लिन, जमर्नी शहरावर पहिला बॉम्बहल्ला केला.
- १९३३: डायक्सी भूकंप, चीन — या भूकंपात किमान ९००० लोकांचे निधन.
- १८७५: कॅप्टन मॅथ्यू वेब — इंग्रजी चॅनेल पोहून ओलांडणारे पहिले व्यक्ती बनले.
- १८३५: पहिला ग्रेट मून होक्स — चंद्रावर जीवन आहे असा शोध जाहीर करणारा लेख न्यूयॉर्क सनमध्ये प्रकाशित झाला.
- १६०९: गॅलिलिओ गॅलीली — यांनी त्यांच्या पहिल्या दुर्बीणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
जन्म
- १९९४: काजोल आयकट — भारतीय लेखक आणि कादंबरीकार
- १९७६: जावेद कादीर — पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
- १९६९: विवेक राजदान — भारतीय क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि स्पोर्ट्सकास्टर
- १९६५: संजीव शर्मा — भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
- १९६३: मिरो सरार — स्लोव्हेनिया देशाचे ८वे पंतप्रधान, स्लोव्हेनियन वकील आणि राजकारणी
- १९६२: डॉ. तस्लिमा नसरीन — बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका
- १९५२: दुलीप मेंडिस — श्रीलंकेचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
- १९४१: अशोक पत्की — संगीतकार
- १९३६: गिरिधारीलाल केडिया — इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड मॅनेजमेंटचे संस्थापक
- १९३०: शॉन कॉनरी — जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेले अभिनेते
- १९२८: हर्बर्ट क्रोमर — जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अभियंते आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
- १९२४: सॅम्युअल बॉवर्स — अमेरिकन व्हाईट नाईट्स ऑफ द कु क्लक्स क्लॅनचे सह-संस्थापक
- १९२३: गंगाधर गाडगीळ — साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ — साहित्य अकादमी पुरस्कार
- १९२३: रीमा पिटिला — फिन्निश वास्तुविशारद, कालेवा चर्चचे सह-रचनाकार
- १९१६: फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स — अमेरिकन बालरोगतज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
- १९०३: अर्पाद एलो — हंगेरियन-अमेरिकन बुद्धिबळपटू, एलो रेटिंग प्रणालीचे निर्माते
- १९००: हॅन्स अॅडॉल्फ क्रेब्स — जर्मन चिकित्सक आणि बायोकेमिस्ट — नोबेल पुरस्कार
- १८८८: इनायतुल्ला खान मश्रिकी — पाकिस्तानी गणितज्ञ आणि अभ्यासक
- १८८२: सेन टी. ओ'केली — आयर्लंड देशाचे २रे अध्यक्ष, आयरिश पत्रकार आणि राजकारणी
- १८७७: जोशुआ लिओनेल कोवेन — अमेरिकन उद्योगपती, लिओनेल कॉर्पोरेशन कंपनीचे सह-संस्थापक
- १८५०: चार्ल्स रिचेट — फ्रेंच फिजिओलॉजिस्ट आणि जादूगार — नोबेल पुरस्कार
- १८४१: एमिल थिओडोर कोचर — स्विस चिकित्सक आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
- १७८६: बव्हेरियाचा लुडविग पहिला — बावरिया देशाचे राजा
- १५३०: इव्हान द टेरिबल — रशियन शासक
निधन
- ३८३: ग्रॅटियन — रोमन सम्राट
- २०१३: रघुनाथ पनिग्राही — भारतीय गायक-गीतकार
- २०१२: नील आर्मस्ट्राँग — चंद्रावर पाऊल ठेवलेले पहिले मनुष्य, अमेरिकन अंतराळवीर
- २००९: मांडे सिदिबे — माली देशाचे पंतप्रधान, मालियन अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
- २००८: अहमद फराज — उर्दू शायर
- २००६: नूर हसनअली — त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे २रे अध्यक्ष, त्रिनिदादियन वकील आणि राजकारणी
- २००१: केन टायरेल — इंग्लिश रेस कार चालक आणि व्यापारी, टायरेल रेसिंगचे संस्थापक
- २००१: डॉ. व. दि. कुलकर्णी — संतसाहित्याचे अभ्यासक समीक्षक
- २००१: उझेयर गरिह — तुर्की अभियंते आणि व्यापारी, अलार्को होल्डिंगचे सह-संस्थापक
- २०००: कार्ल बार्क्स — डोनल्ड डकचे निर्माते हास्यचित्रकार
- १९८८: आर्ट रूनी — अमेरिकन व्यावसायिकाने पिट्सबर्ग स्टीलर्सचे संस्थापक
- १९७६: आयविंड जॉन्सन — स्वीडिश कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — नोबेल पुरस्कार
- १९७०: ताचु नायतो — जपानी वास्तुविशारद आणि अभियंते, टोकियो टॉवरचे रचनाकार
- १९६७: स्टॅनली ब्रुस — ऑस्ट्रेलिया देशाचे ८वे पंतप्रधान
- १९०८: हेन्री बेक्वेरेल — फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
- १८८६: झिनोव्हिओस व्हॅल्विस — ग्रीस देशाचे ३५वे पंतप्रधान, ग्रीक वकील आणि राजकारणी
- १८६७: मायकेल फॅरेडे — इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
- १८२२: विल्यम हर्षेल — जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ
- १२७०: लुई (नववा) — फ्रान्सचा राजा