२८ डिसेंबर जन्म
जन्म
- ०८३३: यी झोन्ग – चीन सम्राट
- ११६४: सम्राट रोकुजो – जपान देशाचे सम्राट
- १८५२: लिओनार्डो टोरेस वाय क्वेडो – स्पॅनिश सिव्हिल इंजिनियर आणि गणितज्ञ
- १८९९: उधम सिंग – भारतीय स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक
- १८९९: गजानन त्र्यंबक माडखोलकर – प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक आणि कादंबरीकार
- १९०३: जॉन फोन न्यूमन – हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ
- १९११: फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक
- १९२२: लिओनेल बोवेन – ऑस्ट्रेलिया देशाचे उपपंतप्रधान, सैनिक, वकील आणि राजकारणी
- १९२२: स्टॅन ली – स्पायडर मॅनचा जनक
- १९२६: शिरीष कुमार – भारतीय स्वातंत्र्यसैनिक
- १९२७: नित्यानंद स्वामी – उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री
- १९३२: धीरुभाई अंबानी – भारतीय उद्योगपती, रिलायन्सचे संस्थापक – पद्म विभूषण
- १९३५: एस. बालसुब्रमण्यम – भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक
- १९३७: रतन टाटा – भारतीय उद्योगपती, परोपकारी टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस – पद्म विभूषण, पद्म भूषण
- १९४०: ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री
- १९४१: इंतिखाब आलम – भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आणि प्रशिक्षक
- १९४५: वीरेंद्र – नेपाळचे राजे
- १९५२: अरुण जेटली – भारतीय राजकीय नेते – पद्म विभूषण
- १९६९: लिनस तोरवाल्ड्स – लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक