२०२५:लडाख आंदोलन— लडाखचे राज्यत्व आणि सहावी अनुसूची मागणीसाठीचे आंदोलन हिंसक; ४ जणांचा मृत्यू आणि ६० पेक्षा जास्त जखमी; भाजप कार्यालय आणि वाहन जाळले.
२०१५:हज चेंगराचेंगरी— मक्का शहरात हज चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११०० लोकांचे निधन तर ९३४ लोक जखमी.
२०१४:मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम)— भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटरने मार्स ग्रहाची कक्षा ओलांडली. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी रित्या पूर्ण करणारा भारत देश हा पहिला देश ठरला.
२००९:G20 समिट— पिट्सबर्गमध्ये ३० जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत सुरू झाले.
२००७:टी-२० विश्वकप २००७— भारताने टी-२० विश्वकप जिंकला.
१९९९:कैगा अणूशक्ती प्रकल्प— दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
१९९६:अणु-चाचणी-बंदी करार— ७१ राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वसमावेशक अणु-चाचणी-बंदी करारावर स्वाक्षरी केली.
१९९४:सलमान रश्दी— सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.