७ जून घटना - दिनविशेष


२०२२: USB-C - युरोपियन युनियन मधील देशांनी आणि कायदेकर्त्यांनी पहिल्यांदाच मोबाइल फोन, टॅब्लेट आणि कॅमेर्‍यांसाठी सिंगल चार्जिंग पोर्ट (USB-C) वापरण्यास सहमती दर्शविली.
२०२२: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) बिटुमिनस काँक्रीटचा ७५ किलोमीटर (किमी) लांबीचा महामार्ग १०५ तास आणि ३३ मिनिटांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे.
२०१७: म्यानमारच्या हवाई दलाचे शानक्सी Y8 हे अंदमान समुद्रात कोसळले आणि त्यातील सर्व१२२ लोकांचे निधन.
२००६: अबू मुसाब अल झरकावी यांची अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात हत्या.
२००४: शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) - राजकीय पक्षाची स्थापना.
२००१: युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.
२०००: ब्लू लाइन - संयुक्त राष्ट्रांनी इस्रायल आणि लेबनॉनमधील सीमा निश्चित करून दिली.
१९९४: आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
१९९१: माउंट पिनाटुबो ज्वालामुखी उद्रेक - यामुळे ७ किलोमीटर उंच राख उडाली.
१९९१: फिलिपाइन्स - देशातील मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.
१९८५: बोरिस बेकर - हे विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७व्या वर्षी जिकणारे सर्वात तरुण खेळाडू बनले.
१९८१: ऑपरेशन ऑपेरा - इस्त्रायली हवाई दलाने इराकची ओसिराक अणुभट्टी नष्ट केली.
१९७९: रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.
१९७५: सोनी बीटामॅक्स - सोनी कंपनीने पहिले व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर (VCR) सुरु केले.
१९७५: क्रिकेट विश्वकप - पहिल्या क्रिकेट विश्वकप स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.
१९६५: अमेरिका - सर्वोच्च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
१९६२: अल्जियर्स विद्यापीठ, अल्गेरिया - ऑर्गनायझेशन आर्मी सेक्रेट (ओएएस)ने अल्जियर्स विद्यापीठाच्या ग्रंथालयाला आग लावली आणि सुमारे ५ लाखाहून अधिक पुस्तके नष्ट झाली.
१९४४: दुसरे महायुद्ध - क्रेटन देशातील ३५० ज्यू आणि २५० पक्षपाती नागरिकांना घेऊन जाणारी स्टीमर डॅनाइ जहाज बुडाले. त्यात सर्व प्रवाशांचे निधन.
१९४२: दुसरे महायुद्ध - मिडवेची लढाई: अमेरिकेचा विजय, लढाई संपली.
१९४२: दुसरे महायुद्ध - अलेउटियन बेटांची मोहीम: इंपिरियल जपानी सैन्याने अलास्कातील अलेउशियन बेटांमधील अट्टू आणि किस्का या अमेरिकन बेटांवर कब्जा करण्यास सुरुवात केली.
१९३८: दुसरे चीन-जपानी युद्ध - १९३८चा पिवळ्या नदीचा पूर: चीनच्या सरकारने जपानी सैन्याला रोखण्यासाठी निसर्गाचा वापर करून हल्ला केला.
१९३८: डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.
१९२९: लॅटरन करार - या करारामुळे व्हॅटिकन सिटी अस्तित्वात आली.
१९१७: पहिले महायुद्ध - मेसिनेसची लढाई: मित्र राष्ट्रांच्या सैन्यानेजर्मन खंदकांच्या खाली अनेक स्फोट केलेट, त्यात किमान १०हजार जर्मन सैनिकांचे निधन.
१८९३: महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024