१४ ऑक्टोबर घटना - दिनविशेष

  • जागतिक मानक दिन

१९८२: रोनाल्ड रेगन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.
१९८१: होस्नी मुबारक - यांची इजिप्तचे ४थे अध्यक्ष म्हणून निवड.
१९६८: जिम हाइन्स - १००-मीटर स्प्रिंट पाळण्याच्या शर्यतीमध्ये ९.९५ सेकंद वेळेसह तथाकथित 'दहा-सेकंदचा अडथळा' पार करणारे पहिले धावपटू बनले.
१९६६: मॉन्ट्रियल मेट्रो - मॉन्ट्रियल शहरातील भूमिगत जलद संक्रमण प्रणाली सुरु झाली.
१९५६: बाबासाहेब आंबेडकर - यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.
१९५२: कोरियन युद्ध - ट्रायंगल हिलची लढाई: १९५२ची सर्वात मोठी आणि रक्तरंजित लढाई आहे.
१९४७: चक येगर - हे ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक बनले.
१९३३: जर्मनी - लीग ऑफ नेशन्स आणि जागतिक नि:शस्त्रीकरण परिषदेतून माघार घेतली .
१९२६: ए. ए. मिल्ने - यांचे विनी-द-पूह हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले.
१९२०: ऑक्सफर्ड विद्यापीठ - पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश दिला.
१९२०: टार्टूचा करार - फिनलंड आणि सोव्हिएत रशियाने काही प्रदेशांची देवाणघेवाण करून या करारावर स्वाक्षरी केली.
१९१२: थियोडोर रुझवेल्ट - अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर व्यक्तीने खुनी हल्ला केला.
१८८४: जॉर्ज ईस्टमनला - यांनानवीन पेपर-स्ट्रीप फोटोग्राफिक फिल्मचे अमेरिकन सरकारचे पेटंट मिळाले .
१८०८: फ्रान्स - देशाने रागुसा प्रजासत्ताक जिंकून घेतले.
१७७३: पोलिश-लिथुआनियन कॉमनवेल्थ - येथे अधिकृत नोंदणी केलेले पहिले शिक्षण मंत्रालय सुरु झाले.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024