१५ जून घटना - दिनविशेष

  • जागतिक हवा दिन

२०२२: इंटरनेट एक्सप्लोरर - मायक्रोसॉफ्टचे ब्रॉउसर २६ वर्षांनी बंद.
२०१२: निक वॉलेंडा - हे नायगारा धबधब्यावर यशस्वीरित्या दोरीवर चालणारे पहिले व्यक्ती बनले.
२००८: लेहमन ब्रदर्स - या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.
२००१: विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम - यांनी राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
२००१: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) - चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापना केली.
१९९७: अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
१९९४: इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९९३: संपूर्ण देशी बनावटीच्या सहा अर्जुन रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
१९९१: माउंट पिनाटूबोचा ज्वालामुखी - २० व्या शतकातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकात फिलिपाइन्स मधील ८०० पेक्षा जास्त लोकांचे निधन.
१९७०: बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.
१९४४: दुसरे महायुद्ध - अमेरिकेने जपानच्या दक्षिण सागरी आदेशाची राजधानी सायपनवर आक्रमण केले.
१९४०: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन एरियल: जर्मनीने पॅरिस आणि बहुतेक देश ताब्यात घेतल्यानंतर मित्र राष्ट्रांच्या सैन्याला फ्रान्सच्या बाहेर काढण्यास सुरुवात केली.
१९३७: नांगा पर्वत - जर्मन गिर्यारोहक कार्ल विएन यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेतील सोळा सदस्यांचे भुसत्खलमुळे निधन. ८००० मीटर शिखरावर एकाच वेळी झालेली हि सर्वात मोठी हानी आहे.
१९२१: बेसी कोलमन - यांना वैमानिकाचा परवाना मिळवला, त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन महिला वैमानिक बनल्या
१९१९: कॅप्टन जॉन अलकॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.
१९०४: स्टीमबोट एस.एस. जनरल स्लोकम - जहाजाला लागलेल्या आगीत किमान १ हजार लोकांचे निधन.
१८६९: महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
१८४४: चार्ल्स गुडइयर - यांनी रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.
१६६७: पहिले रक्त संक्रमण - वैद्यकीय इतिहासात प्रथमच डॉ. जीन-बॅप्टिस्ट डेनिस यांनी १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024