२२ फेब्रुवारी घटना - दिनविशेष


२०११: न्यूझीलंड - देशातील दुसरा सर्वात भयंकर भूकंप क्राइस्टचर्चमध्ये झाला, या दुर्घटनेत किमान १८५ लोकांचे निधन.
१९७९: सेंट लुसिया - देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७८: यशवंत विष्णू चंद्रचूड - यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७४: इस्लामिक सहकार्य संघटना - लाहोर, पाकिस्तान येथे झालेल्या शिखर परिषदेत, ३७ देश आणि २२ राष्ट्रप्रमुख आणि सरकार सहभागी होऊन, बांगलादेश देशाला मान्यता देतात.
१९५९: ली पेटी - अमेरिकन कार रेसर, यांनी पहिली डेटोना ५०० रेस जिकली.
१९५८: संयुक्त अरब प्रजासत्ताक - इजिप्त आणि सीरिया या देशांनी मिळून निर्माण केले.
१९४८: झेकोस्लोव्हाकिया - देशामध्ये कम्युनिस्ट क्रांती.
१९४४: दुसरे महायुद्ध - अमेरिकन विमानांनी चुकून निजमेगेन, अर्न्हेम, एन्शेडे आणि डेव्हेंटर या डच शहरांवर बॉम्बफेक केली, परिणामी एकट्या निजमेगेन शहरात किमान ८०० लोकनाचे निधन.
१९४४: दुसरे महायुद्ध - सोव्हिएत रेड आर्मीने क्रिव्होई रोग प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.
१९४२: दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.
१८५६: युनायटेड स्टेट्स रिपब्लिकन पक्ष - पिट्सबर्ग येथे पहिले राष्ट्रीय अधिवेशन सुरू केले.
१८१९: ऍडम्स-ऑनिस करार - स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024