२७ जानेवारी घटना - दिनविशेष


९८: ट्राजान हे रोमन सम्राट झाले.
१९८३: जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (५३.९०० किमी जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला करण्यात आला.
१९७३: पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.
१९६७: केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग लागून त्यात गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी पडले
१९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.
१९४५: दुसरे महायुद्ध रशियाच्या रेड आर्मीने पोलंडमधील ऑस्विच येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.
१९४४: दुसरे महायुद्ध ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.
१९२६: जॉन लोगीबेअर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.
१८८८: वॉशिंग्टन डी. सी. येथे द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी ची स्थापना.
१८८०: थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024