२८ जुलै घटना - दिनविशेष

  • जागतिक हिपॅटायटीस दिन

२०१७: नवाझ शरीफ - पाकिस्तानचे पंतप्रधान, यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आजीवन पदासाठी अपात्र ठरवले.
२००१: इयान थॉर्प - जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सहा सुवर्णपदके जिंकणारे पहिले जलतरणपटू ठरले.
२००१: इंदिरा गोस्वामी - आसामी लेखिका, यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
१९८४: ऑलिम्पिक - लॉस एंजिलिस, अमेरिका येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९७९: चौधरी चरणसिंग - यांची भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी निवड.
१९७६: चीन - देशाच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ लोकांचे निधन तर १,६४,८५१ जखमी झाले.
१९६०: फोक्सवॅगन कायदा - अंमलात आला.
१९५७: इसहाया, जपान ढगफुटी - येथे झालेल्या मुसळधार पाऊसमुळे किमान ९९२ लोकांचे निधन.
१९४३: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन गोमोरा: रॉयल एअर फोर्सने जर्मनीवर बॉम्बफेक केलेल्या हल्ल्यात किमान ४२००० जर्मन नागरिकांचे निधन.
१९४२: दुसरे महायुद्ध - जोसेफ स्टॅलिन यांनी ऑर्डर क्रमांक २२७ जारी केला.
१९३४: काँग्रेस राष्ट्रीय पक्ष - पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी स्थापना केली.
१९३३: अँडोरा - देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१८८३: इशिया बेटावरील भूकंप - येथे झालेल्या ४.३ - ५.२ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपातकिमान २३०० लोकांचे निधन.
१८६६: विनी रीम - यांना वयाच्या 18 व्या वर्षी अमेरिकेच्या सरकारकडून अब्राहम लिंकनच्या पुतळ्यासाठी कमिशन प्राप्त करणारी पहिली आणि सर्वात तरुण महिला कलाकार बनली.
१८२१: पेरू - देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
१६५६: दुसरे उत्तर युद्ध - वॉर्साची लढाई सुरू झाली.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024