२०१४:
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर - अधिकृतपणे न्यूयॉर्क शहरात उघडले.
१९८८:
श्रीलंका-मालदीव युद्ध - श्रीलंकन सैनिकांनी मालदीव देशावर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
१९८२:
अफगाणिस्तान - सालंग बोगद्याच्या आगीत १५०-२००० लोकांचे निधन.
१९७३:
मरिनर प्रोग्राम - नासाने मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहाच्या दिशेने प्रक्षेपित केले.
१९६७:
व्हिएतनाम युद्ध - डाक टूची लढाई सुरू झाली.
१९५७:
लायका - रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली.
१९५६:
हंगेरियन क्रांती - नवीन हंगेरियन सरकार स्थापन झाले
१९५०:
एअर इंडियाचे फ्लाइट २४५ अपघात - जिनिव्हा विमानतळाकडे जात असताना मॉन्ट ब्लँकमध्ये कोसळले, त्यात विमानातील सर्व ४८ लोकांचे निधन.
१९४९:
चिनी गृहयुद्ध - डेंगबू बेटाची लढाई झाली.
१९४९:
वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
१९४६:
जपान - देशाचे संविधान सम्राटाच्या संमतीने स्वीकारले गेले.
१९४४:
अखिल भारतीय संगीत परिषद - पुण्यात सुरुवात.
१९४३:
दुसरे महायुद्ध - अमेरिकन हवाई दलाच्या पाचशे विमानांनी जर्मनीतील विल्हेल्मशेव्हन बंदर उध्वस्त केले.
१९४२:
दुसरे महायुद्ध - कोली पॉइंट कारवाई ग्वाडालकॅनल मोहिमेदरम्यान सुरू झाली.
१९११:
शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी - सुरु झाली.
१९०३:
पनामा - कोलंबियापासून वेगळे झाले.
१८६८:
जॉन विलिस मेनार्ड (आर-एलए) - हे अमेरिकेतील कॉंग्रेससाठी निवडलेले पहिले आफ्रिकन अमेरिकन बनले.
१८३८:
द टाइम्स ऑफ इंडिया - जगातील सर्वात मोठे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र, बॉम्बे टाइम्स आणि जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापन झाले.
१८१७:
बँक ऑफ मॉन्ट्रियल - कॅनडा देशातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक, मॉन्ट्रियलमध्ये उघडली.
१८१२:
नेपोलियन - व्याझ्माच्या लढाईत नेपोलियनच्या सैन्याचा पराभव झाला.
१४९३:
ख्रिस्तोफर कोलंबस - कॅरिबियन समुद्रातील डोमिनिका बेट प्रथम पाहिले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025