९ जून घटना - दिनविशेष


२००७: बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
२००६: फुटबॉल विश्वकप - १८वी फुटबॉल विश्वकप स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.
२००१: भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.
१९९७: सुखोई-३० के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.
१९७५: ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.
१९७४: सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.
१९७०: ऍनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
१९६४: लाल बहादुर शास्त्री - यांनी भारताचे २रे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
१९५९: यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन - या पहिल्या अणुशक्तीवर चालणाऱ्या अमेरिकन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचे अनावरण.
१९५७: ब्रॉड शिखर - १२वे सगळ्यात उंच शिखर ऑस्ट्रियन गिर्यारोहक फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर आणि हर्मन बुहल यांनी चढले.
१९४८: आंतरराष्ट्रीय अभिलेख परिषद (International Council on Archives) - स्थापना.
१९४६: राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.
१९४४: दुसरे महायुद्ध - फ्रान्समधील टुले येथे जर्मन सैन्याने ९९ नागरिकांना लॅम्पपोस्ट आणि बाल्कनीतून फासावर लटकवले.
१९३४: डोनाल्ड डक - कार्टून पहिल्यांदा द व्हाइज लिटिल मर्न मध्ये दिसले.
१९३१: रॉबर्ट गोडार्ड - यांनी अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणाऱ्या रॉकेटचे पेटंट मिळाले.
१९२८: चार्ल्स किंग्सफोर्ड स्मिथ - यांनी पहिले ट्रान्स-पॅसिफिक अमेरिका ते ऑस्ट्रेलिया उड्डाण पूर्ण केले
१९२३: बल्गेरिया - देशात लष्करी उठाव झाला.
१९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.
१९०६: स्वातंत्र्यवीर सावरकर - यांचे लंडनला प्रयाण.
१८६६: अलाहाबाद उच्च न्यायालय - स्थापना.
१७००: दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
१६९६: छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना पुत्र झाला. मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले.
१६६५: मराठा साम्राज्य - मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024