२०२४:
झिम्बाब्वे गोल्ड - झिम्बाब्वे देशाने झिम्बाब्वे गोल्ड हे नवीन चलन सुरु केले आहे, जे सोन्याच्या साठ्या आणि परकीय चलनांवर आधारित आहे.
२००५:
पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.
१९९३:
मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले
१९५०:
भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.
१९२९:
भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
१९२१:
आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.
१९११:
डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.
१८३८:
द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024