२८ जुलै
घटना
- २०१७: नवाझ शरीफ — पाकिस्तानचे पंतप्रधान, यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आजीवन पदासाठी अपात्र ठरवले.
- २००१: इयान थॉर्प — जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सहा सुवर्णपदके जिंकणारे पहिले जलतरणपटू ठरले.
- २००१: इंदिरा गोस्वामी — आसामी लेखिका, यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
- १९८४: ऑलिम्पिक — लॉस एंजिलिस, अमेरिका येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
- १९७९: चौधरी चरणसिंग — यांची भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी निवड.
- १९७६: चीन — देशाच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ लोकांचे निधन तर १,६४,८५१ जखमी झाले.
- १९६०: फोक्सवॅगन कायदा — अंमलात आला.
- १९५७: इसहाया, जपान ढगफुटी — येथे झालेल्या मुसळधार पाऊसमुळे किमान ९९२ लोकांचे निधन.
- १९४३: दुसरे महायुद्ध — ऑपरेशन गोमोरा: रॉयल एअर फोर्सने जर्मनीवर बॉम्बफेक केलेल्या हल्ल्यात किमान ४२००० जर्मन नागरिकांचे निधन.
- १९४२: दुसरे महायुद्ध — जोसेफ स्टॅलिन यांनी ऑर्डर क्रमांक २२७ जारी केला.
- १९३४: काँग्रेस राष्ट्रीय पक्ष — पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी स्थापना केली.
- १९३३: अँडोरा — देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
- १८८३: इशिया बेटावरील भूकंप — येथे झालेल्या ४.३ - ५.२ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपातकिमान २३०० लोकांचे निधन.
- १८६६: विनी रीम — यांना वयाच्या 18 व्या वर्षी अमेरिकेच्या सरकारकडून अब्राहम लिंकनच्या पुतळ्यासाठी कमिशन प्राप्त करणारी पहिली आणि सर्वात तरुण महिला कलाकार बनली.
- १८२१: पेरू — देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
- १६५६: दुसरे उत्तर युद्ध — वॉर्साची लढाई सुरू झाली.
जन्म
- १९७०: पॉल स्ट्रँग — झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू
- १९५४: ह्युगो चावेझ — व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष
- १९४५: जिम डेव्हिस — अमेरिकन व्यंगचित्रकार
- १९३६: सरगॅरी सोबर्स — वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
- १९३२: हिरेन भट्टाचार्य — भारतीय कवी आणि लेखक — साहित्य अकादमी पुरस्कार
- १९२९: जॅकलिन केनेडी — जॉन एफ. केनेडी यांची पत्नी
- १९०९: के. ब्रह्मानंद रेड्डी — आंध्र प्रदेशचे ३रे मुख्यमंत्री
- १९०७: अर्ल टपर — टपरवेअरचे संशोधक
- १८५७: बॅलिंग्टन बूथ — इंग्रजी-अमेरिकन कार्यकर्ता, अमेरिकेच्या स्वयंसेवकांचे सहसंस्थापक
निधन
- ४५०: थियोडॉसियस दुसरा — पवित्र रोमन सम्राट
- २०२०: रवी कोंडाला राव — भारतीय तेलगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक
- २०१६: महाश्वेता देवी — भारतीय बंगाली लेखक, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या — पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
- १९८८: सैद मोदी — राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे
- १९८१: बाबूराव गोखले — नाटककार
- १९७७: पंडित राव नगरकर — गायक आणि अभिनेते
- १९७५: राजा ठाकूर — चित्रपट दिग्दर्शक
- १९६९: रॅमन ग्रौ — क्युबा देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष
- १९६८: ऑटो हान — जर्मन रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
- १९३४: लुइस टँक्रेड — दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू
- १८४९: चार्ल्स अल्बर्ट — सार्डिनिया देशाचे राजा
- १८४४: जोसेफ बोनापार्ते — नेपोलियनचा फ्रेंच भाऊ
- १७९४: मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे — फ्रेंच क्रांतिकारी