२०२५:मुखी चित्ता— मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय उद्यानातील मादी चित्ता “मुखी” ही Project Cheetah अंतर्गत भारतात जन्मलेली आणि प्रौढत्वाला पोहोचलेली पहिली चित्ता ठरली; हा पुनर्वसन कार्यक्रमासाठी ऐतिहासिक टप्पा मानला गेला
२०२२:रशिया— अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यापलेल्या युक्रेनियन प्रदेशांना रशियाशी जोडण्यासाठी प्रवेश करारावर स्वाक्षरी केली.
२०१६:मॅथ्यू चक्रीवादळ— हे श्रेणी ५ चक्रीवादळ, २००७ पासून कॅरिबियन समुद्रात तयार होणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ बनले.
२००९:सुमात्रा भूकंप— या ७.६ मेगावॉट भूकंपात किमान १,११५ लोकांचे निधन.
१९९९:टोकाइमुरा अणु अपघात— जपान देशातील दुसरा सर्वात वाईट अणु अपघात.
१९९८:के. एन. गणेश— यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.
१९९४:मजरुह सुलतानपुरी— गीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार.
१९९३:लातूर भूकंप— या ६.२ मेगावॉट आणि मर्केली तीव्रता (८वि श्रेणी) भूकंपाने महाराष्ट्रात किमान ९,७४८ लोकांचे निधन तर ३० हजार पेक्षा जास्त जखमी.
१९६८:बोईंग ७४७— प्रथमच लोकांसमोर आणून लोकांसमोर प्रकाशित करण्यात आले.
१९६६:बोत्सवानाला— देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
१९६२:जेम्स मेरेडिथ— यांनी वांशिक पृथक्करणाचे नियम झुगारून मिसिसिपी विद्यापीठात प्रवेश केला.
१९६१:दुलीप करंडक— पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.
१९५४:युएसएस नॉटिलस— पाणबुडी जगातील पहिली अणुशक्तीवर चालणारी जहाज म्हणून कार्यान्वित झाली.
१९४९:बर्लिन एअरलिफ्ट— संपली.
१९४७:संयुक्त राष्ट्र— पाकिस्तान देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९४१:दुसरे महायुद्ध— बाबी यार हत्याकांड: संपले.
१९३८:म्युनिक करार— ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटली यांनी म्युनिक करारावर स्वाक्षरी केली, जर्मनीने चेकोस्लोव्हाकियाचा सुडेटनलँड प्रदेश मिळवला.
१९३८:लीग ऑफ नेशन्स— एकमताने 'नागरी लोकसंख्येवर हेतुपुरस्सर बॉम्बफेक' प्रतिबंधित केली.
१९३५:हुव्हर धरण, अमेरिका— बांधकाम पूर्ण झाले.
१९१८:युक्रेनचे स्वातंत्र्ययुद्ध— दिब्रिव्हकाची लढाई: नेस्टर मख्नोच्या नेतृत्वाखालील बंडखोर सैन्याने केंद्रीय शक्तींचा पराभव केला.
१९१५:पहिले महायुद्ध— शत्रूच्या विमानाला जमिनीवरून हवेत गोळ्या घालणारे रॅडोजे लजुटोव्हॅक हे इतिहासातील पहिले व्यक्ती बनले.
१९०९:आरएमएस मॉरेटेनिया जहाज— या जहाजाने अटलांटिक महासागर विक्रमी वेळेत पश्चिमेकडील क्रॉसिंग केले.
१८८२:ऍप्लेटॉन एडिसन लाइट कंपनी— थॉमस एडिसन यांचा पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प सुरू झाला.
१३९९:हेन्री (चौथा)— इंग्लंडचे राजा बनले.
११३९:काकेशस पर्वत भूकंप— सेल्जुक साम्राज्यातील काकेशस पर्वतावर झालेल्या ७.७ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे किमान ३ लाख लोकांचे निधन.
जन्म
१९९७:मॅक्स वर्स्टॅपन— डच फॉर्मुला १ ड्रायव्हर
१९८०:मार्टिना हिंगीस— स्विस लॉनटेनिस खेळाडू
१९७२:शान— भारतीय पार्श्वगायक
१९६१:चंद्रकांत पंडित— क्रिकेटपटू
१९५५:अँनी बेचोलॉल्म्स— सन मायक्रोसिस्टिम्सचे सहसंस्थापक
१९४५:एहूद ओल्मर्ट— इस्रायलचे १२वे पंतप्रधान
१९४३:जोहान डायझेनहॉफर— जर्मन रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
१९४१:कमलेश शर्मा— ५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस
१९३९:ज्याँ-मरी लेह्न— फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
१९३४:ऍना काश्फी— भारतीय-अमेरिकन अभिनेत्री
१९३३:प्रभाकर पंडित— संगीतकार व व्हायोलिनवादक
१९२२:हृषिकेश मुखर्जी— भारतीय चित्रपट दिग्दर्शक — पद्म विभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार
१९०५:नेव्हिल फ्रान्सिस मॉट— इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
१९००:एम. सी. छागला— न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री
१८३२:ऍन जार्विस— मातृदिन(मदर्स डे) च्या सहसंस्थापिका
१२०७:रूमी— फारसी मिस्टीक आणि कवी
निधन
२०१४:इफ्तिकार हुसैन अन्सारी— भारतीय राजकारणी, मौलवी